जिल्हा, राज्य व राष्ट्र स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजनजिल्हा स्तरावर 5 सप्टेंबर,राज्य स्तरावर 20 सप्टेंबर पर्यंत निबंध जमा करावेत- निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे
कोल्हापूर, दि. 18 : ‘अ फ्युचर विदाऊट प्लॅस्टीक वेस्ट-थ्रु सस्टेनॅबिलिटी अँड सर्क्युलॅरिटी’ (A FUTURE WITHOUT PLASTIC WASTE- through Sustainability and Circularity) या संकल्पनेवर Online जिल्हा, राज्य व राष्ट्र स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा इयत्ता 8वी, 9वी, 10 वी आणि 11 वी, 12 वी या दोन गटासाठी आहे. स्पर्धेसाठी निबंध जमा करण्याची अंतिम तारीख जिल्हा स्तरावर 5 सप्टेंबर तर राज्य स्तरावर 20 सप्टेंबर असेल, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे.
स्पर्धेसाठी नोडल अधिकारी म्हणून शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. 12 वी इयत्तेसाठी वयोमर्यादा 31 मार्च 2021 रोजी 18 वर्षे पूर्ण अशी असेल.
इ. 8वी, 9वी, 10वी साठी स्पर्धेचे विषय याप्रमाणे -
1. Principles of Reduce, Reuse, Recycle in Plastic Waste Management. 2. Innovative Ideas for Zero Plastic Waste School Events. 3. Reducing the Infacts of Single Use Plastic Products through Alternative Products.
इ. 11वी, 12 वीसाठी स्पर्धेचे विषय याप्रमाणे-
1. Creating a Circuler Economy for Plastic Waste - Role of Citizens. 2. Reducing Single Use Plastic Polution - Role of Youth 3. Mainstreaming Alternatives to Single Use Plastic Product through Innovation & Creativity
स्पर्धेचे माध्यम हे Online असून भाषा माध्यम हे इंग्लिश, हिंदी किंवा त्या राज्याची प्रादेशिक भाषा असेल. Online निबंध PDF File Format मध्ये जमा करावेत. त्याची मर्यादा 500 ते 800 शब्द इतकी असेल. Font size 12 हा इंग्रजी भाषेसाठी व हिंदी आणि प्रादेशिक भाषेकरीता 14 असेल व Line Spacing 1.5 असेल.
विद्यार्थी हे त्यांच्या शाळेमध्ये अंतिम दिनांकापूर्वी निबंध जमा करतील. एका विद्यार्थ्यांचा एकच निबंध ग्राह्य धरला जाईल. एकापेक्षा जास्त असल्यास तो अवैध धरला जाईल, निबंध हा कोणत्याही गोष्टीचा Copy right नसावा. त्यासाठी शाळांसाठी स्वतंत्र सूचना जिल्हा नोडल अधिकारी देतील. शाळांना काही शंका असल्यास जिल्हा नोडल अधिकारी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, मो. क्र. 9822076538 यांच्याशी संपर्क साधावा.
No comments