महापालिकेच्यावतीने गणेश उत्सव सन 2021 बाबत नागरीकांना व सार्वजनिक मंडळांना आवाहन
कोल्हापूर ता.18 : सार्वजनिक गणेशोत्सव - 2021 माहे सप्टेंबर महिन्यामध्ये दि. 10 सप्टेंबर 2021 ते दि. 19 सप्टेंबर 2021 अखेर साजरा होत आहे. सध्यस्थितीमध्ये सर्वत्र कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूमुळे कोरोना आजाराचा प्रादूर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव काळात गणेश मुर्ती आगमन व विसर्जन या दरम्यान नागरिकांची गर्दी होऊ नये व सोशल डिस्टंगस्टिंगचे पालन व्हावे याकरिता मा.उप सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे क्रमांक-आरएलपी-0621/ प्र.क्र. 144/ विशा 1 ब दि. 29 जून 2021 रोजीचे परिपत्रकान्वये सार्वजनिक गणेशउत्सव पार पडताना मार्गदर्शक सुचना जाहिर केलेल्या आहेत. या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
या अनुषंगाने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचे अध्यक्षतेखाली बुधवार, दि.18 ऑगस्ट 2021 रोजी सर्व संबंधी खातेप्रमुखांची बैठक आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील श्रीचे आगमन व विसर्जन कालावधीमध्ये गणेशोत्सव मार्गावरील खड्डे मुजविणे, रस्त्यावरील खरमाती, दगडाचे ढीग, अतिक्रमणे व इतर अडथळे काढणेच्या सुचना शहर अभियंता यांना दिल्या. सार्वजनिक रस्त्यांवरील व विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था ठेवणेच्या सुचना सहा.विद्युत अधिक्षक यांना दिल्या. गणेश विसर्जन कुंड व विसर्जन ठिकाणी स्वच्छता करणेच्या सुचना मुख्य आरोग्य निरिक्षक यांना दिल्या. प्रत्येक प्रभागामध्ये गणेश मुर्ती आगमन व विसर्जन दरम्यान नागरिकांची गर्दी होणार नाही व सोशल डिस्टंगस्टींगचे पालन होणेकरिता प्रभागात खुल्या जागा / मैदाने यांची निवड करणेच्या सुचना शहर अभियंता यांना दिल्या. महापालिका व सामाजिक संस्था/अशासकीय संस्था/ विविध मंडळे यांचेमार्फत कृत्रिम विसर्जन कुंड अथवा काहील ठेवावयाच्या जागा निश्चितीकरण करुन संबंधितांची बैठक घेऊन जागेची नोंद व मुर्ती संकलन वाहतुक याबाबतचे नियोजन करणेच्या सूचना पर्यावरण अभियंतांना दिल्या.
तसेच गणेशोत्सव काळात संपूर्ण शहरात स्वच्छतेची विषेश मोहिम राबविणार असून यासाठी आवश्यक ते कर्मचारी वर्ग नेमण्यात येणार आहे. आग्निशामन विभागामार्फत दक्षता पथक सज्ज ठेवण्यात आली आहेत. विसर्जन कुंडाजवळील संकलित केलेल्या मुर्तीचे वाहतूकीकरिता वाहतूक व्यवस्था उदा. टॅक्टर ट्राली, ट्रक इ. व्यवस्थेचे नियोजन करण्या येत आहे. गणेश उत्सव कालावधीपुर्वी मोठया प्रमाणात प्लॅस्टीक बंदीसाठी जनजागृती, स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागामध्ये काहिल ठेवण्यात येणार आहेत.
No comments