शहरात 5039 नागरीकांचे लसीकरण
कोल्हापूर ता.24 : मंगळवारी महापालिकेच्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे 5039 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर 39 व 18 ते 45 वर्षापर्यंत 3588 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. तर 45 ते 60 वर्षापर्यंत 1022 नागरीकांचे व 60 वर्षावरील 390 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले.
बुधवार, दि.25 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरीकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी Cowin Portal वर ऑनलाईन रजिस्टेशन केले आहे. फक्त त्यांनीच महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केद्राकडे लसीकरण करण्यासाठी यावे. बुधवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थनगर, मोरेमाने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.
No comments