चव्हाण कुटुंबीयांना ' संवाद ' चे बळ : व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून एकेचाळीस हजार रोख रकमेची मदत
बालिंगा : प्रतिनिधी.
पाचगाव (ता.करवीर) येथील पत्रकार दीपक चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पouboश्चात कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट बनल्याचे समजताच सामाजिक बांधिलकी जोपासत ' संवाद ' व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून एकेचाळीस हजार रोख रकमेची मदत चव्हाण यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. रोख स्वरूपात मदत देऊन चव्हाण कुटुंबीयांना ' संवाद ' व्हाट्सएप ग्रुपने बळ दिले.
तरुण वयातच दीपक यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या पत्नी, दोन वर्षांची दोन जुळी मुले व सहा वर्षांची एक मुलगी यांच्यावर मोठा आघात कोसळला. कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट बनली. त्यामुळे या कुटुंबाला मदतीचा हातभार लावावा या उदात्त हेतूने संवाद व्हाट्सएप ग्रुपमध्ये मदतीसाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनास ग्रुपमधील दातृत्वशील सदस्यांनी चांगला प्रतिसाद देत जमेल तशी मदत जमा करत ४१ हजार रुपयांचा निधी जमा केला. हा जमा केलेला निधी चव्हाण कुटुंबीयांना रोख स्वरूपात आज गुरुवारी देण्यात आला.
यावेळी दीपक कुंभार यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदतीस प्रतिसाद मिळाला. बिकट परिस्थितीत असणाऱ्या चव्हाण कुटुंबाला थोडाफार आर्थिक हातभार लावू शकलो याचे समाधान वाटते. चव्हाण कुटुंबाने दुःख बाजूला सारून पुढे जावे असे आवाहन केले.
यावेळी उद्योजक प्रताप पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील, भोगावती कारखान्याचे माजी संचालक बी.ए.पाटील, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, इंजि. राजेंद्र मांगलेकर (कोल्हापूर), बालिंगा सरपंच मयूर जांभळे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर, पत्रकार युवराज पाटील, अध्यापक रावसाहेब शिंदे, अध्यापक एकनाथ कुंभार, सामाजिक कार्यकर्ते संभाजी नाळे, दिलीप पाटील (साबळेवाडी), दयानंद जाधव, संदीप सुतार, सावर्डे दुमाला ग्रा.पं.सदस्य पंढरीनाथ मोहिते, तेरसवाडी सरपंच बबन कदम, चाफोडी ग्रा.पं सदस्य साताप्पा सुर्वे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : पाचगाव (ता.करवीर) येथील कै. पत्रकार दीपक चव्हाण कुटुंबीयांकडे आर्थि8u
क मदत सुपूर्द करताना 'संवाद ' व्हाट्सएप ग्रुपचे मान्यवर.
No comments