Header Ads

Header ADS

नगररचना विभागाकडून विशेष कॅम्पमध्ये दोन दिवसात 86 भोगवटा प्रमाणपत्रे


कोल्हापूर ता.27 :- महानगरपालिका नगररचना विभागाच्यावतीने दि.5 मे 2021 पुर्वी ऑफलाईन पध्दतीने नगररचना विभागाकडे सादर झालेली आहेत. विकास परवानगी कामांच्या भोगवटा प्रमाणपत्रावर प्रशासकिय मंजुरीची कार्यवाही तात्काळ होणेसाठी गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या विशेष कॅम्पमध्ये एकूण 86 फाईल्स निर्गत करुन भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात आली. शुक्रवारी कॅम्पमध्ये एकूण 58 अर्ज दाखल झाले होते. यापैकी 45 फाईल्स निर्गत करुन भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात आली. तर  8 प्रकरणे कागदपत्रे अपूरी असल्याने निकाली काढण्यात आली. उर्वरीत 5 प्रकरणे प्रलंबित आहेत. या विशेष कॅम्पचे बागल मार्केट राजारामपुरी येथील नगररचना विभागात आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, सर्व कनिष्ठ अभियंता, सर्वेअर उपस्थित होते.

----------------------------

No comments