Header Ads

Header ADS

*संपतराव गायकवाड यांना शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल जीवनगौरव सन्मान जाहीर


प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी.
शाहूवाडी तालुक्यातील शैक्षणिक व्यासपीठ या  शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत नामांकित संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला जातो. यावर्षी संस्थेच्या *२०व्या वर्धापन दिनानिमित्ताने* माजी शिक्षण सहाय्यक संचालक संपतराव गायकवाड यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा सन्मान  येथील शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने करणेत येणार आहे.
         संपतराव गायकवाड यांच्या शिक्षण सेवेला शाहूवाडी तालुक्यातून सुरुवात झाली . शिक्षण विस्तार अधिकारी ते सहा. शिक्षण संचालक पर्यंतच्या प्रवासात त्यांनी आपल्या कृतिशील कार्यातून हजारो शिक्षकांना ,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. परखड वाणी आणि मायेचा गोडवा त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवतो. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम राबवून शिक्षकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.गायकवाड उत्तम प्रशासक ,वक्ता लेखक याद्वारे ते शिक्षण क्षेत्रात अनमोल योगदान देत आहेत.शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने *५ सप्टेंबर २०२१ रोजी* शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मानपत्र , ग्रंथ देऊन उचित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
       शैक्षणिक व्यासपीठ या संस्थेच्या वतीने दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिना निमित्त विद्यार्थी ,शिक्षक ,शाहूवाडी भूषण , शिक्षण भूषण तसेच विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्तींना सन्मानित करण्यात येते.या वर्षी २० व्या वर्धापन दिनानिमित्त होणारा कार्यक्रम कोरोनाचा पार्श्वभूमीवर जानेवारी २०२२ मध्ये संपन्न होणार आहे.अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये देण्यात आली. माजी शिक्षण सहाय्यक संचालक संपतराव गायकवाड. यांना जाहीर झालेल्या जीवन गौरव पुरस्काराने शिक्षक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून गायकवाड यांच्यावर शुभेच्यांचा वर्षाव होतं आहे.

No comments