‘आझादी का अमृत महोत्सव’ यानिमित्त नवी मुंबईतील बेलापूर येथे छायाचित्र प्रदर्शनभारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या माहितीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन
मुंबई, 23 ऑगस्ट 2021
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क कार्यालय, पुणे व पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आतापर्यंत अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी माहितीवर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन नवी मुंबई मधील बेलापूर स्थित केंद्रीय सदन येथे आजपासून सुरु झाले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील ‘दुर्लक्षित नायक अर्थात अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान लक्षात आणून देणे, हा उद्देश यामागे आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय 23 ते 29 ऑगस्ट हा आठवडा “आयकॉनीक वीक” म्हणून साजरा करत आहे. या अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत.
No comments