Header Ads

Header ADS

*ऊस नोंदीसाठी कोगे गट कार्यालयावर सभासदांची झुंबड*।

बालिंगा / प्रतिनिधी.
 सध्या कोरोनाची भीती सर्वत्र आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. सोशल डिस्टंसिंग हे महत्त्वाचे आहे, पण आज दोन ऑगस्ट रोजी कोगे तालुका करवीर येथील येथील कारखाना गट कार्यालयात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला दिसून आला. आडसाली ऊस नोंद करण्यासाठी गट कार्यालयात सभासदांची झुंबड उडाली होती. या ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्यामुळे कोणतेही कोरोना नियम न पाळता सभासद नोंद करण्यासाठी गर्दी करून उभारले होते. तसेच रांगेमध्ये सामाजिक अंतर न राखता सभासद उभे होते तसेच नोंद घेण्याच्या ठिकाणी खूप वेळ वादावादी सुरू होती. आडसाली उसाची नोंद एक ऑगस्ट ला केल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच कारखान्याकडे ऊस गाळपास जातो. त्यामुळे कोगे परिसरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आडसाली उसाची लागण केली जाते व कारखान्याच्या नियमाप्रमाणे एक तारखेला नोंद केली जाते ,पण नोंद घेताना नियोजनाचा अभाव दिसून आला. अनेक सभासद काहीवेळा बोगस नोंदी देतात अशाही तक्रारी झाल्या आहेत. गेली पाच ते सहा वर्ष अशा पद्धतीने नोंद करण्याच्या दिवशी वादावादी झुंबड उडाल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते, पण गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव आहे,अशावेळी सामाजिक अंतराचे नियम पाळून नोंदी होणे आवश्यक आहे. पण याठिकाणी कारखान्याची यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसून आले.

  

No comments