नागपूर हिवाळी अधिवेशनातील दुपारच्या सत्रात प्रचंड गोंधळ झाला....
288 आमदारांपैकी 287 आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली.फाईल्स फेकून दिल्या सभागृहाचे कामकाज चालूच दिलं नाही.गोंधळ घालणारया आमदारांनी सभागृहाची दयनीय अवस्था करून टाकली...
287 आमदार सभागृहाच्या बाहेर निघून गेले.त्या सभागृहात फक्त एकच आमदार होते ते म्हणजे आदरणीय #गणपतराव_देशमुख....
गणपतराव देशमुख सभागृहात मान खाली घालून दोन्ही हात डोक्याला लावून चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले....
दुसऱ्या दिवशी #इंडियन_एक्सप्रेस या वर्तमानपत्रा मध्ये डोक्याला दोन्ही हात लावून बसलेल्या गणपतराव(आबा) देशमुखांचा फोटो छापून आला ती बातमी व फोटो पाहून लोकांना एक विलक्षण धक्का बसला....
287 आमदारांनी अधिवेशनात गोंधळ का घातला असेल...?
महाराष्ट्रातील जनतेला वाटलं गरीबाच्या पुनर्वसनाचा अथवा या पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेच्या लोकहितासाठी गोंधळ घातला गेला असेल ?
पण जेव्हा लोकांना कळलं की फायली भिरकावत कालचा गोंधळ हा #आमदारांची_पेन्शन_वाढ_करावी म्हणून घातला गेला होता....
त्या सभागृहात डोक्याला हात लावून बसलेले एकमेव आमदार गणपतराव देशमुख (आबा ) यांना पेन्शन वाढ नको होती....
नंतर पत्रकारांनी गणपतराव ( आबा ) देशमुख यांना विचारले तुम्हाला पेन्शन वाढ का नको आहे....?
पत्रकारांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देतेवेळी गणपतराव देशमुख यांनी सांगितले की....
महाराष्ट्रातील बहुतांश जनता ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही
गरीब हे आणखीनच गरीबच होत चाललेत.त्यांना रहायला घरे नाहीत.महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत....
आपल्याला लोकांनी विकासकामं करण्यासाठी निवडून दिले आहे स्वतःची पेंन्शन वाढ करून घेण्यासाठी नव्हे....!
इतका गोंधळ होऊन देखील तिसऱ्या दिवशी पेन्शनवाढ मंजूर झाली........😢
कारण सभागृहात सर्वच नेते गणपतराव ( आबा ) देशमुख नव्हते....!
घरातून बाहेर पडल्यानंतर घरासमोर उभारून मिळेल त्या एस.टी.बसने प्रवास सुरू करून मतदारसंघ पिंजून काढणारे व मंत्रीपद जाताच क्षणी सरकारी गाडीचा त्याग करणारे तसेच जमिनीशी जोडली गेलेली नाळ तुटू न देणारे आदरणीय गणपतराव ( आबा ) देशमुख यांना....
भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन!
- #अमर_रामचंद्र_गोडसे.
काँग्रेस कार्यकर्ता
💐🌼💐🌼💐🌼💐🌼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments