Header Ads

Header ADS

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी अपूर्व चंद्र


नवी दिल्ली,  : भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी अपूर्व चंद्र यांची माहिती  व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनट नियुक्ती समितीने गुरुवारी अपूर्व चंद्र यांच्या नियुक्तीस मंजुरी  दिली. श्री. चंद्र हे महाराष्ट्र  कॅडरच्या १९८८ तुकडीतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाचे सचिव तसेच संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण विभागात महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. 
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामध्येही श्री  चंद्र प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी  २०१३ ते २०१७ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात प्रधान सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.  
                                         0000

1 comment: