*घनकचरा दुर्गंधी पासून प्रवाशांची सुटका करणार. -- सरपंच मयूर जांभळे
*प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी.*
कोल्हापूर - रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या आशीर्वादाने भोगावती नदीतीरावर वसलेलं आणि गगनबावडा राज्य महामार्गाला लागून जवळपास 7500 लोकवस्ती असलेलं बालिंगा गाव होय. सर्व सुविधा यांनी परिपूर्ण अशी ओळख परंतु या गावाला जमिनीचे क्षेत्रचं कमी असल्यामुळे गावातील जमा होणारा घनकचरा संकलन करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होतं आहे. पण गावचं आरोग्य सांभाळणं हे गावचे प्रथम नागरिक या नात्याने ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी लोकांच्या घनकचऱ्याची सोय व्हावी म्हणून बालिंगा व नागदेववाडी गावातील ग्रामपंचायतीकडून सर्व घनकचरा कोल्हापूर - गगन बावडा राज्य महामार्गा लगत टाकला जातं होता. पण याचाच गैरफायदा घेऊन या मार्गावरून जाणारे बाहेरील प्रवाशी, आसपासच्या गावातील ग्रामस्थ यांनी आपल्या गावातील, घरातील घन कचरा, मृत जनावरे, खराब अंथरून, पांघरून आदी वस्तू राजरोसपणे टाकणे सुरु झाले त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशी वर्गाला दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. तर ग्रामपंचायतीकडे वारंवार होणारी तक्रार याची ग्रामपंचायत बालिंगा यांनी दखल घेऊन आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजीपोटी सरपंच मयूर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे, सर्व सदस्य यांनी प्रवाशी वर्गाची दुर्गंधी पासून सुटका करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. गेली दोन दिवस जे. सी. बी. लावून कोल्हापूर महामार्गा प्रयन्त पोहचलेला दुर्गंधी युक्त कचरा जवळपास शंभर फूट आत पडक्या खाणीत टाकला. त्यामुळे या राज्य महामार्गावरून प्रवास करताना आता कोणालाही त्रास होणार नाही. याची काळजी मात्र ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आली आहे. एकंदरीत बालिंगा ग्रामपंचायतीने प्रवाशी वर्गातून होणारी घनकचरा विल्हेवाट मागणी निकालात काढल्यामुळे बालिंगा ग्रामपंचायतीचे प्रवाशी वर्गासह,पंचक्रोशीत कौतुक होतं आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जांभळे, रंगराव वाडकर, विजय जांभळे, कृष्णात माळी, धनंजय ढेंगे यांनी दोन दिवशी सकाळ पासून हजेरी लावून काम पूर्ण केले.यासाठी नागदेववाडी ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले असे सरपंच मयूर जांभळे यांनी यावेळी सांगितले.
No comments