गावाबाहेरील घनकचरा टाकणाऱ्यावर कारवाई करणार* *सरपंच - मयूर जांभळे*
बहुतांशी गावांना जागा नसल्यामुळे ग्रा. पं. ला. सतत भेडसवणारा प्रश्न म्हणजे घनकचरा व्यवस्थापन हाच आहे. सरपंचपदावर विराजमान झाल्यावर याची जाणीव झाली. गावची सोय आणि प्रवाशी वर्गाची दुर्गंधी पासून सुटका कशी करता येईल याचा मेळ याचं नियोजन गेली आठ दिवस मी व माझे सर्व सहकारी यांनी करून घनकचरा नियोजन करण्याचे ठरले.रस्त्याच्या बाजूला पत्रे लावून परिसर बंधिस्त करणार आहे. त्यामुळे बाहेरील पडणारा घनकचरा कायम स्वरूपी बंद होईल. तसेच बाहेरील कचरा टाकणाऱ्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला असल्याचे सरपंच मयूर जांभळे. यांनी सांगितले.
No comments