एकोंडी येथे कृषिकन्येकडून विविध प्रात्यक्षिके
कागल तालुक्यातील एकोंडी येथे कृषी विषयक बीजप्रक्रिया, चारा प्रक्रिया, सोयाबीन मधील तण नियंत्रण, फळझाडांचे खत व्यवस्थापन अशा विविध विषयांवर महाविद्यालयाची कृषीकन्या अक्षदा सोनू तुरे यांनी प्रात्यक्षिकांद्वारे तांत्रिक मार्गदर्शन केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शरद कृषी महाविद्यायल, जैनापूर यांच्यावतीने ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत पारंपारिक शेतीसोबत नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करुन उत्पादन वाढीवर कशा प्रकारे भर द्यावा याबाबतचेही प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, अनिल बागणे, प्रा. डॉ. बी. डी. माणगावे, प्रा. एस. एच. फलके, प्रा. पी. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
000
No comments