Header Ads

Header ADS

कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे १६ हजार डोस उपलब्ध

कोल्हापूर, दि. २६  :  कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे सुमारे १६ हजार डोस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 
    प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा -  ६३०, भुदरगड - ६८० , चंदगड - ९५० , गडहिंग्लज - १ हजार १८०, गगनबावडा -१७०, हातकणंगले - ३ हजार २९०, कागल - ९२०, करवीर - १ हजार ७२० , पन्हाळा - ९३०, राधानगरी - ९७०, शाहूवाडी - ८१०  तर  शिरोळ तालुक्यासाठी १ हजार ५३० डोस प्राप्त झाले आहेत.
सीपीआर रूग्णालयासाठी २२० , सेवा रूग्णालय, (कसबा बावडा ) ५०० तर कोल्हापूर महानगरपालिका १ हजार ५०० असे एकूण १६ हजार डोस प्राप्त झाले आहेत.
   ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरविण्यात आला आहे. संबंधितांनी लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे .
                              000000

No comments