Header Ads

Header ADS

प्रामाणिकपणा

 कोल्हापूर शहरातील वृत्तपत्र विक्रेते श्री.दिलीप मोरे हे राजारामपुरी ते जवाहरनगर या मार्गावर आज सकाळी वृत्तपत्र वाटत असताना जवाहरनगर रोडवर त्यांना पैशाचे पाकीट सापडले.त्यांनी ते पाकीट कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एंजटस् असोसिएशनचे अध्यक्ष श्री. किरण व्हणगुत्ते यांच्या कडे दिले. सदरचे पाकीट तपासून पाहिले असता  संबंधित पाकीट हे श्री. सिध्देश लोहार यांचे असल्याचे समजले .त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधून श्री.लोहार यांना सदरचे पाकीट खालील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उपस्थित परत करण्यात आले.
या पाकीटामध्ये 3 एटीएम् कार्ड ,1आधार कार्ड, 1पँन कार्ड व रोख रक्कम 3260/-रुपये होते .
श्री.दिलीप मोरे  यांना देवू केलेले बक्षीसही त्यांनी नाकारले. यापूर्वीही त्यांना वीस हजार रुपयाचा मोबाईल 📲सापडला होता. तोही त्यांनी परत केला आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एंजटस् असोसिएशन(रजि.)चे अध्यक्ष श्री.किरण व्हणगुत्ते ,श्री.सुरेश ब्रम्हपुरे, श्री.सतीश दिवटे, श्री.अनील चव्हाण, श्री.दाजी मोरे, श्री.संजय पवार आदी उपस्थित होते
या प्रामाणीकपणाबद्दल श्री .दिलीप मोरे यांचे अभिनंदन 💐👏💐👏💐👏

No comments