Header Ads

Header ADS

अन माणुसकी गहिवरली..... बालींगा ग्रा. पं. कर्मचाऱ्यांकडून मृत वानरावर विधिवत अंत्यसंस्कार


*प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी.*
        आज शनिवार श्रीरामाचे दूत मारुती यांचा वार कोल्हापूर गगन बावडा राज्य महामार्गावर दुपारी 4 :30 ची  वेळ श्री. महादेव मंदिराजवळ विधुत वाहिनीला स्पर्श होऊन  विजेचा धक्का बसून वानराचा ( मारुती ) मृत्यू झाला.  या राज्य महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशी वर्गातून  हळहळ व्यक्त होतं होती.याची माहिती ग्रामपंचायतीला कळताच क्षणाचाही विलंब न करता ग्रामपंचायत कर्मचारी यांनी  विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. ग्रामपंचायत कर्मचारी रघुनाथ कांबळे, संदीप कोरवी, संतोष कांबळे, यांनी पांढर कापड, भगवं कापड, कापूर, अगरबती, खोबरे, गुलाल, हार आदी साहित्य आणून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या  ट्रॅक्टर ट्रॉली मधून बालिंगा स्मशान भूमीच्या मागे खड्डा खणून या वानराचे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 अंत्यसंस्कार करतेवेळी सरपंच मयूर जांभळे, विजय पोवार, संतोष जाधव.आदी उपस्थित होते.

No comments