Header Ads

Header ADS

*ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकालात काढणार*. गटविकास अधिकारी जयवंत उगले. यांचे आश्वासन


बालिंगा / प्रतिनिधी :-- करवीर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघ (आयटक संलग्न ) यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले. यांची कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे अध्यक्ष कॉ. नामदेवराव गावडे.जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश पाटील,करवीर तालुका अध्यक्ष कॉ.संतोष जाधव, करवीर तालुका  सचिव कॉ.शिवाजी पोवार.आदींनी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
 गटविकास अधिकारी उगले यांनी निवेदन स्विकारून मागण्यांचे वाचन करून  1 ते 7 मागण्यासाठी पंचायत समिती स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर निकालात काढू असे आश्वासन यावेळी दिले. निवेदन स्विकारताना पंचायत समिती करवीर (ग्रामपंचायत विभाग) विस्तार अधिकारी संदेश भोईटे. उपस्थित होते.
प्रलंबित मागण्या पुढील प्रमाणे.
1)10 ऑगस्ट 2020रोजी उधोग     ऊर्जा व कामगार विभागाने काढलेल्या राज्य पत्राप्रमाणे किमान वेतनानुसार  परिपत्रक काढावे.
2 )सुधारित राहणीमान भत्ता लागू करावा.
3 )ग्रामपंचायत कर्मचारी यांचा विमा ग्रामपंचायत मार्फत सुरु करणेबाबत.
4 ) 35 %रक्कम कर्मचारी यांच्या पगारापोटी शिल्लक ठेवणे बाबत.
5 )जल सुरक्षा रक्षक मानधन खात्यावर जमा करणे बाबत.
6 )ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे.
7 )ग्रामपंचायत कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रमाणे रजा व सुट्या मिळाव्यात.
     वरील प्रमाणे मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
  निवेदन देताना विशाल कांबळे, शिवाजी पाटील,सुभाष पाटील,अमित नलगे, सर्जेराव सासणे,निलेश बरगे,अजित पाटील,सुभाष मोरे,जयवंत पाटील, संदीप कुंभार,संभाजी आंबी , सरदार पाटील,रंगराव कदम, संदीप चव्हाण,उदय शिंदे,बंडोपंत जासूद,आदी  उपस्थित होते.

No comments