जिल्ह्यातील 6 बंधारे पाण्याखालीराधानगरीतून 1400 क्युसेक्सचा विसर्ग
कोल्हापूर, दि. 10 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 231.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड. भोगावती नदी- खडक कोगे असे एकूण 6 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-231.03, तुळशी -93.10, वारणा -878.16, दूधगंगा – 628.87, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-63.10, पाटगाव 98.91, चिकोत्रा- 41.10, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.43, घटप्रभा - 41.50, जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 16.07 फूट, सुर्वे 18.02, रुई 44.06, इचलकरंजी 41, तेरवाड 39.06, शिरोळ 32 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 29.09 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
No comments