कोल्हापूर जिल्ह्याची लसीकरणात आघाडी कोविशिल्डचे ४० हजार डोस उपलब्ध
कोल्हापूर, दि. १६ : कोल्हापूर जिल्ह्याने लसीकरणात आघाडी घेत आज अखेर तब्बल १९ लाख ५० हजार ८७६ नागरिकांचे लसीकरण केले तर आज जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे ४० हजार डोस उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा - ११३०, भुदरगड - १२८० चंदगड - १७६० , गडहिंग्लज - २०५०, गगनबावडा -३००, हातकणंगले - ८७९०, कागल - २८८०, करवीर - ४१८० , पन्हाळा -२७७०, राधानगरी - १९१०, शाहूवाडी - १७७० तर शिरोळ तालुक्यासाठी ४ हजार १८० डोस प्राप्त झाले आहेत.
सीपीआर रूग्णालयासाठी ३०० , सेवा रूग्णालय, (कसबा बावडा ) ५०० तर कोल्हापूर महानगरपालिका ६ हजार २०० असे एकूण ४० हजार डोस प्राप्त झाले आहेत.
आज आरोग्य विभागाने जिल्ह्यात २३ हजार ५६६ इतक्या नागरिकांना लस दिली .संबंधितांनी आपला नंबर आल्यानंतर लस घ्यावी , लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये ,असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले .
000000
No comments