रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दररोजच्या आहात रानभाजी लाभदायक - डाॅ बाचूळकर तारळे खुर्द (ता .राधानगरी) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग ,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन
तारळे खुर्द : आजकाल प्रत्येक व्यक्तीला दररोजच्या आहारामध्ये रानभाज्या असणे आवश्यक असताना ते बाजूला ठेवून पिझा आणि बरगरची ओढ निर्माण झाली आहे.चायनीज फूडचं आकर्षण निर्माण झाल्याने खऱ्या अर्थानं आरोग्यदायी जीवनाची वाटचाल रोगग्रस्त जीवनाकडे गेल्याची खंत शिवाजी विद्यापीठाचे वनस्पती शास्त्र विभागाचे निवृत्त प्राचार्य आणि निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ मधुकर बाचुळकर यांनी व्यक्त केली.
तारळे खुर्द (ता .राधानगरी) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग ,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी डाॅ. बाचूळकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबीटकर होते. यावेळी शेतकर्यांनी रानभाज्यांचे उत्पादन वाढविले तर त्याचे मार्केटिंग करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे गरजेचे आहे. राधानगरीच्या जैवविविधतेला देशामध्ये वेगळी ओळख असून आपण सर्वांनी चायनीजची दुकाने बंद करून रानभाज्यांच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करावेत असे आम.आबिटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून म्हणाले.
या रानभाजी मोहत्सवामध्ये तालुक्यातील महिला बचतगट आणि शेतकरी महिलांनी पन्नासहून अधिक रानभाज्याचे पदार्थ आणि रानभाज्याचे प्रदर्शन मांडले होते.यावेळी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ मधुकर बाचुळकर यांनी प्रत्येक जैवविविधतेची माहिती देत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचे अधिक महत्त्व असल्याचे सांगितले.निलगिरी व अष्टमबाभुळ या परदेशी वृक्षापेक्षा देशी वृक्ष जगले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे शेवटी डाॅ. बाचूळकर यांनी आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती सभापती सोनाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महोत्सवामध्ये रानभाज्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या महिलांना व भातपिक स्पर्धेत नंबर आलेल्या रंगराव पाटील पिरळ यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी जालिंदर पांगरे,कृषी सहाय्यक एम.एस.कांबळे,तारळे खुर्द सरपंच आनंदा पाटील, आत्मा समिती सदस्य अशोक फराकटे, संग्रामसिंह पाटील,रावसाहेब डोंगळे, शिल्पा पाटील,उत्तम पाटील, साताप्पा पाटील,मारुती चौगले, कृष्णातएकल,शेतकरी सल्ला समिती पदाधिकारी शेतकरी महिला बचतगट प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विभागाचे सहाय्यक तंत्र व्यवस्थापक सुनील कांबळे केले तर आभार तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी मानले.
फोटो-तारळे खुर्द येथील रानभाजी महोत्सवात मार्गदर्शन करताना डाॅ. बाचूळकर शेजारी आम.आबिटकर,कृषी अधिकारी पाटील,पांगरे व इतर
No comments