सोमवारी लोकशाही दिन
कोल्हापूर, दि. 31 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
लोकशाही दिनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, तसेच शासनाकडील दिनांक 26 सप्टेंबर 2012 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. परंतु न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व, अपिल्स, सेवाविषयक,आस्थापना विषयक बाबी, अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे. अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकृत करण्यात येणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
000000
No comments