एम. जी. पाटील यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित
दोनवडे ः धुंदवडे (ता. गगनबावडा) येथील माजी सरपंच, विविध सेवा संस्थेचे संस्थापक व धामणी खोर्याचे नेते एम. जी. पाटील यांना वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाच्या राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
गगनबावडा तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून वाड्या वस्त्यांमध्ये स्वखर्चातून सेवा सुविधा, सौरउर्जा लाईट, पाणी, गरिबांना धान्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कोविड सेंटरला मास्क, सॅनिटायझर वाटप, पूरग्रस्तांना व दुष्काळग्रस्तांना मदत आदी कार्य एम. जी. पाटील यांनी केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
सहायक आयुक्त विशाल लोंढे, तहसीलदार दिलीप रायनावर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सपोनि नंदकुमार मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनधिकारी प्रसाद संकपाळ, पल्लवी कोरगावकर, संस्थापक अध्यक्ष विजय तोडकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
No comments