आधारला मोबाईल लिंक करण्यासाठीडाक विभागाची पुन्हा विशेष मोहीम
कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर डाक विभागाने पोस्टमनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयातून UIDAI च्या CELCAPP व्दारे आधारला मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याच्या सुविधेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. खास लोकाग्रहास्तव दि. 6 ते 7 सप्टेंबर दरम्यान या मोहिमेव्दारे नागरिकांना घरपोच आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी पुन्हा विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेव्दारे नागरिकांना घरपोच त्यांच्या आधारला मोबाईल क्रमांक लिंक/ अपडेट करता येणार आहे. मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष/सेक्रेटरी सर्व रहिवाशांसाठी एकत्रितपणे एकाच वेळेस लिंकिंगसाठी त्यांच्या पोस्टमनला भेटू शकतात व ह्या विशेष मोहिमेदरम्यान सर्वांचे आधार-मोबाईल लिंक करून घेवू शकतात. याबरोबरच इतर मोठ्या आस्थापना, कार्यालय प्रमुख देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे सर्वांचे आधार मोबाईल अपडेट करून घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमनशी संपर्क करू शकतात.
अधिक माहितीसाठी आयपीपीबीचे www.ippbonline.com
No comments