*वयाच्या 107 व्या वर्षीही त्याच उत्साहात मुक्ताईच्या हस्ते श्री. गणेशाची प्रतिष्ठापणा*.......
*बालिंगा /प्रतिनिधी*.
बालिंगा, ( ता. करवीर ) येथील बालिंगा गावचे माजी उपसरपंच दशरथ भाऊसो वाडकर. यांच्या मातोश्री -- मुक्ताबाई भाऊसो वाडकर. ( वय वर्षे 107 ) यांच्या हस्ते 107 व्या वर्षी श्री गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापना अगदी आनंदात आणि उत्साहात वाडकर कॉलनीतील रहिवाशी असलेले सागर बापूसो कोपार्डेकर .यांच्या घरी करण्यात आली. त्यांचा हा गणेशाप्रती असलेल्या भक्ती- भावाची चर्चा परिसरात आहे.
मुक्ताई यांनी आपल्या शुभ हस्ते केलेली गणेश प्रतिष्ठापना आजही तरुण वर्गाला आदर्श ठरणारी आहे.
No comments