*शिवसेना नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी. देवराज नरके*......*बालिंगा येथे 140 पूरग्रस्तांना साहित्य वाटप*.
*बालिंगा / प्रतिनिधी*.
ज्या ज्या वेळी सर्वसामान्य जनता संकटात असेल त्यावेळी शिवसेना नेहमीच पाठीशी राहते आणि आहे. असे उदगार युवा नेते देवराज नरके. यांनी काढले. करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके. यांनी बालिंगा येथील पूरग्रस्तांना पाठवलेल्या संसार उपयोगी साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. बालिंगा माजी उपसरपंच श्रीकांत भवड, ग्रामपंचायत सदस्य रंगराव वाडकर, युवा सेना अध्यक्ष अजय वाडकर, राजाराम कोरवी . यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी 140 पूरग्रस्तांना साहित्य वाटप करण्यात आले.
त्याआधी देवराज नरके, यांच्या हस्ते क्रांती बॉईज मंडळाच्या पर्यावरण वाचवा संदेश देणाऱ्या श्री. गणेशाची आरती करण्यात आली. आकर्षक मूर्ती पाहून नेहमीच क्रांती बॉईज मंडळाचे विधायक कार्य असते. हा आदर्श इतर मंडळानी घ्या असे ते म्हणाले.
यावेळी काशिनाथ माळी, शिवाजी वाडकर,रोहित वागवेकर, निलेश पाटील राम भवड,युवराज यादव, संतोष तोडकर,रमेश वरुटे,युवराज यादव आदिसह पूरग्रस्त उपस्थितीत होते.
No comments