राधानगरी तालुक्यातील सर्व गणेश भक्तांनी कोरोना काळात शासनाने दिलेल्या आदेशानुसार गणेश उत्सव साजरा करावा : विभागीय निर्भयापथक उपनिरीक्षक अनुराधा पाटील
दुर्गमानवाड शिवाजी पाटील तारळे खुर्द : राधानगरी तालुक्यातील सर्व गणेश भक्तांनी कोरोना काळात शासनाने दिलेल्या आदेशानुसार गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन विभागीय निर्भयापथक उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व सरपंच यांच्या बैठकीत केले.
तालुक्यातील सरपंच व पोलीस पाटील यांची पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश उत्सव डाॅलबी ,मिरवणुक मुक्त करून शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी राधानगरी येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी पाटील यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी राधानगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विश्वास पाटील,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास पाटील,उपाध्यक्ष कृष्णात पोवार,पोलीस पाटील संघटना अध्यक्ष विक्रम सणगर,उपाध्यक्ष सदाशिव गुरव,कार्याध्यक्ष उत्तम पाटील, राजाराम पोवार,पोलीस पाटील महिला अध्यक्षा सुलभा चव्हाण तसेच तालुक्यातील सर्व सरपंच व पोलीस पाटील उपस्थित होते.
फोटो: राधानगरी तालुक्यातील सरपंच व पोलीस पाटीलांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना अनुराधा पाटील
No comments