गोकुळ दुध संघामार्फत दुध उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहनपर विविध योजना लाभ दुध उत्पादकांनी घ्यावा : गोकुळचे नुतन संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.किसनराव चौगले
गुडाळ येथील दुध संस्थेच्या सत्कार समारंभात उपसरपंच कोथळकर यांचा सत्कार करताना गोकुळचे संचालक प्रा.चौगले शेजारी कोथळकर,हुजरे व इतर
दुर्गमानवाड शिवाजी पाटील तारळे खुर्द : गोकुळ दुध संघामार्फत दुध उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहनपर विविध योजना आहेत त्याचा लाभ दुध उत्पादकांनी घ्यावा तसेच प्रत्येक दुध उत्पादक शेतकर्यानी म्हैस दुध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे असे गोकुळचे नुतन संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.किसनराव चौगले यांनी आवाहन केले.
गुडाळ (ता. राधानगरी)येथील श्री लक्ष्मी-नारायण महिला सहकारी दुध संस्थेच्यावतीने प्रा.चौगले तसेच नुतन उपसरपंच दत्तात्रय कोथळकर, माजी उपसरपंच प्रकाशराव मोहिते,दिग्वीजय गाडगीळ,स्वप्निल पाटील, कु.शुभम पाटील,कु.वैष्णवी पाटील व कु.मयुरी कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपती मोहिते होते.
या दुध संस्थेचे संस्थापक व भोगावतीचे माजी संचालक महादेवराव कोथळकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची माहिती दिली.उपस्थितांचे स्वागत डी.एस.पाटील यांनी केले तर कार्यक्रमास भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, पी.एस.पाटील,वाय.डी.पाटील, के.आर. पाटील,संस्था अध्यक्षा विजया कोथळकर,भारती माळवी,दिपाली पाटील ,भिकाजी पाटील,संस्थेचे सर्व सदस्य सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते. आभार संस्था सचिव राजेंद्र पाटील यांनी मानले.
No comments