Header Ads

Header ADS

कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के रुजू


*कोल्हापूर, दि.13(जिमाका): कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के रुजू झाले. सहायक संचालक (माहिती) फारुख बागवान यांच्याकडून आज सुनील सोनटक्के यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.*

  यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहायक एकनाथ पवार, सचिन वाघ, रोहित माने, सतीश कोरे, अनिल यमकर, दामू दाते, स्वप्नाली कुंभार आदी उपस्थित होते.

     मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी गावचे असणाऱ्या सुनील सोनटक्के यांनी आजवर जळगाव येथे माहिती अधिकारी म्हणून तर हिंगोली, सोलापूर व लातूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. लातूर विभागाचे प्रभारी उपसंचालक म्हणून  त्यांनी 10 महिने अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. याशिवाय बीड, उस्मानाबाद येथे प्रत्येकी एक वर्ष तर नांदेड येथेही अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्यभार पार पाडला आहे.
      0000000

No comments