Header Ads

Header ADS

रसिका पाटील.यांच्यामुळेचं महिलांना नवदुर्गा दर्शनाचा लाभ . तब्बल दोन वर्षानंत्तर नवदुर्गांचे दर्शनाने महिला आंनदीत*........

     *प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी*
      शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष निवडून आलेल्या शिंगणापूर. ता. करवीर. येथील रसिका अमर उर्फ अमृत पाटील. ( शिंगणापूरकर ) त्यांचे पती अमर उर्फ अमृत पाटील. यांनी आपल्या जिल्हा परिषद मतदार संघाचा रस्ते, गटर्स, शाळा इमारती, नळ पाणी पुरवठा,महापूराच्या काळात गावोगावी लोकांना स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची सोय आदिसह विविध विकास काम करून संपूर्ण जिल्हा परिषद मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला आहे.अयोध्या डेव्हलपर्सचे व्ही. बी. पाटील. मोठे बंधू कॅप्टनउत्तम पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली आता पर्यंत मतदार संघात 19 कोटींच्यावर विकास काम झाली आहेत.पाटील यांनी केलेल्या आदर्शवत विकास कामाची दखल घेऊन पालकमंत्री व ग्रहराज्य मंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पी. एन.पाटील. यांनी रसिका अमर पाटील. यांच्यावर अर्थ व शिक्षण सभापती पदाची जबाबदारी टाकली. सर्व नेत्यांनी टाकलेल्या जबाबदारी या संधीच सोन करण्यासाठी सभापती रसिका अमर पाटील व पती अमर पाटील. यांनी जबाबदारी स्विकारल्या  पासूनचं जिल्ह्यातील शाळांना भेटी देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा आदर्शवत करण्यासाठी नियोजन सुरु केलं आहे. त्यात गेली दोन वर्षे कोरोना आजाराने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे  ज्ञान मंदिर, देवालय, जवळपास सर्व व्यवहार ठप्प झाले. महिलांना तर दोन वर्षे घरात बसाव लागलं. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला व्यवहार पूर्वपदावर येऊ लागलं मग शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तशी देवालयही सुरु झालीत. ती मंदिर घटस्थापनेच्या पूर्व संध्येलाचसुरु झालीत.नवदुर्गा हा महिलांचा आवडता सण हा धागा पकडून गेली दोन वर्षे घरात बसून असलेल्या आपल्या माता, भगिनीं, यांना नवदुर्गाच दर्शन व्हावं यासाठी मतदार संघातील आपल्या कार्यकर्त्या कडून संपूर्ण शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातील महिलांना घर टू घर  जाऊन त्यांना पासची सोय करून दिली.प्रत्येक गावात वाहनांचं नियोजन करून महिलांना नवदुर्गा दर्शन घडवून आणलं. संपूर्ण महिलांना उपवासा करिता फराळाची  सोय करण्यास अर्थ व शिक्षण सभापती रसिका अमर पाटील. व अमर पाटील. हे विसरले नाहीत. एकंदरीत रसिका अमर पाटील. आणि अमर पाटील. यांनी महिलांसाठी केलेली नवदुर्गा दर्शनाची सोय महिलांसाठी नव पर्वनीच होती. सर्व महिलाना या निमित्ताने मोकळीक मिळाल्याने आनंदित झाल्याचं दिसून येत होतं. प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.तर प्रत्येक महिलांच्या तोंडातून रसिका वहिनींच्या मुळेच नवदुर्गा दर्शन घडलं अशी चर्चा गावोगावी होताना दिसली.

No comments