*कात्यायनी देवीची दुसऱ्या दिवशी महाकाली रुपातील पूजा*......*जगातील नवदुर्गा पैकी 6 वी. दुर्गा कात्यायनी देवी*...
*प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी*
कोल्हापूर पासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर डोंगर कपारीत पुरातन कालीन निसर्गरम्य व रमनीय असे बालिंगा. ता. करवीर. गावची ग्रामदेवता श्री. कात्यायनी देवीचं मंदिर म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान होय.
भक्तांची मनोकामना पूर्ण करण्याकरिता हिचा अवतार आहे. राजे घराणे आणि कात्यायनी देवीचं जवळच नातं आहे. कात्यायनी परिसर हे राखीव जंगल होते. रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज या जंगलात येत असतं कात्यायनी देवीचं दर्शन घेऊन शिकारीला जातं. शिकारीहून परतत असताना कात्यायनी देवीच्या भेटीस आले की कात्यायनी देवीचे पुजारी यांना त्याकाळी छत्रपती शाहू महाराज चांदीचा एक रुपया देत असतं अशी माहिती कात्यायनी देवीची सेवा करणारी चौथी पिढीतील पुजारी राजू गुरव. यांनी दिली. कात्यायनी हि कत ऋषीची मुलगी त्यावर तीचे नाव कात्यायनी असे पडले.गेली दोन वर्षे कोरोना आजाराने धुमाकूळ घातल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. या देवीच्या दर्शनाला परजिल्ह्यातून तसेच कर्नाटक आदी भागातून लाखो भाविक येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे या देवीकडे विशेष लक्ष आहे. कात्यायनी मंदिर परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलीस बंदोबस्ताची सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी याही वर्षी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियम व अटीचं पालन करून भक्त भाविकांनी कात्यायनी देवीचं दर्शन घ्यावं यासाठी बालिंगा ग्रामपंचायतीने नेटके नियोजन केलं आहे. कोरोना आजारावर मात करावी यासाठी दर्शन रांग मंडप उभारला आहे.कात्यायनी देवीचं दर्शन 30 फुटावरून घेता येणार आहे.दुसऱ्या दिवशी महाकाली रुपातील पूजा पुजारी राजू गुरव यांनी बांधली आहे. मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत विविध उपक्रम सुरु आहेत. नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात देवीची पूजा बांधण्यात येते.कात्यायनी देवीची नित्यनियमाने पूजा अर्चा पुजारी राजू गुरव, वैभव गुरव, ऋषीकेश गुरव. हे करतात
ग्रामपंचायत कळंबा ता. करवीर तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांचे देवीच्या सेवेसाठी बहुमोल सहकार्य लाभते असे पुजारी राजू गुरव यांनी सांगितले.
No comments