मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत समन्वय समितीची बैठक संपन्न
कोल्हापूर, दि. 26 : कोविड-१९ संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल / विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पुर्तता करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारीत मिशन वात्सल्य योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात
आली आहे.
कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ
झालेल्या बालकांच्या व कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/ विधवा झालेल्या
महिलांना शासनाच्या विविध योजनांचा वात्सल्य या योजनेअंतर्गत लाभ मिळवून
देण्यासाठी तालुकास्तरावर गठीत समन्वय समितीची बैठक हातकणंगलेच्या
तहसिलदार श्रीमती कल्पना ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
तहसिलदार श्रीमती ढवळे म्हणाल्या, कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे
दोन्ही पालक गमविलेल्या बालकांना ५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मिळवून
देण्यासाठी समितीकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे तसेच एक पालक
गमाविलेल्या बालकांना महिला व बाल विकास विभागाकडून बाल संगोपन योजनेचा
लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यासाठी समितीकडून
प्रयत्न केले. तसेच महसूल विभागाकडील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा
गांधी राष्ट्रीय कुटूंब कल्याण योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे पिडीतांना
मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती ढवळे यांनी यावेळी
सांगितले.
बैठकीस इचलकरंजीच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील,
हातकणंगलेच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. डी. शिंदे, व्ही. एम.
माने, तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

No comments