शहराच्या स्वच्छतेबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात – उपआयुक्त रविकांत आडसूळ
कोल्हापूर ता.26 : सर्व आरोग्य निरिक्षक व मुकादम यांनी शहराच्या स्वच्छतेबाबत गांभिर्याने विचार करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सुचना उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी केल्या. महापालिकेच्या आरोग्य निरिक्षक व मुकादम यांची मंगळवारी उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली केशवराव भोसले नाट्यगृह येथे स्वच्छतेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांनी आपले मनोगत व्यकत करताना उपस्थित आरोग्य निरिक्षक व मुकादम यांना आपल्या अधिनस्त प्रभागामध्ये 100 टक्के ओला व सुका कचरा वर्गीकरण करावा. प्रभागातील घरातील दैनंदिन कचरा 100 टक्के संकलन करावा. उघडयावर कचरा टाकणाऱ्यां नागरीकांच्यामध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी व अशा नागरीकांकडून पुन्हा उघडयावर कचरा टाकलेचे निदर्शनास आलेस त्यांच्यावर दंडात्मक करवाई करावी. शहरातील सर्व रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालय यांच्या स्व्चछतेबाबत विशेष काळजी घेण्यात यावी अशा सुचना दिल्या.
उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी आरोग्य निरिक्षक व मुकादम यांच्याकडून प्रभागामध्ये स्वच्छता करत असताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली. स्वच्छतेसाठी आवश्यक त्याठिकाणी मागणीनुसार अतिरिक्त यंत्रणा देण्यात येईल. आरोग्य निरिक्षक व मुकादम यांनी शहराच्या स्वच्छतेबाबत गांभिर्याने विचार करुन यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. प्रभागामध्ये काम करणाऱ्यां सफाई कर्मचारी व कचरा संकलन करणारे ॲटो टिप्परवरील कर्मचारी यांच्याकडून पुर्ण क्षमतेने काम करुन घेण्यात यावे. नागरीकांच्यामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. ज्याठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणी अतिरिक्त ॲटो टिप्परची मागणी करुन फेऱ्या वाढवून प्रभागातील कचरा 100 टक्के संकलन करावा. यापुढे उघडयावर कचरा टाकलेचे आढळून आल्यास संबंधीत नागरीक, आरोग्य निरिक्षक व मुकादम यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य आरोग्य निरिक्षक यांना दिले.यानंतर सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2021 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अभिजीत हुलस्वार, सुनिल पंडत, रुक्साना शेख, शोभा नुईया या कर्मचाऱ्यांचा उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, सर्व आरोग्य निरिक्षक व मुकादम उपस्थित होते.
No comments