सामाजिक सुरक्षा व वेतन संहितामसुद्यावर आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.११ - जिल्ह्यातील सर्व कार्यरत आस्थापना, संस्था मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कामगार व कामगार संघटना प्रतिनिधी यांना कळविण्यात येते की, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 व वेतन संहिता 2019(Code on Wages) च्या नियमांचं प्रारुप मसुदा राज्य शासनाकडून अनुक्रमे 27 ऑगस्ट 2021 व दि 3 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल व्दारे अधिसुचना प्रसिंध्द करण्यात आली आहे. कामगार विभागाच्या महाकामगार या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रारुपाव्दारे बाधित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आले असून प्रारुपासंबंधी आपल्या आक्षेप व सुचना असल्यास प्रारुप प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून पंच्चेचाळीस दिवसांत कामगार आयुक्त , महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, इ ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे पुर्व मंबई 400051 यांना किंवा mahalabourcommr@gmail.com या ई मेलवर पाठवावेत असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
No comments