ई पास रद्द होऊन भक्तांना मंदिरात प्रवेश खुला करण्यासाठीभाजपाच्या वतीने महाद्वार येथे अंबामातेचा जागर
कोल्हापूर दि ३. राज्यातील इतर सर्व मंदिरे कोरोनाचे नियम पाळून पूर्ण क्षमतेने खुली झाली असताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रमुख मंदिरे असणारी अंबाबाई मंदिर व जोतीबा मंदिर येथे भक्तांना दर्शनासाठी ई पासची अद्यपही सक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या अडमुठेपणाच्या निर्णयाबद्दल भाजपाने यापूर्वी देखील निवेदने, निदर्शने केली आहेत. आज आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी लागू केलेली ई पासची सक्ती रद्द करावी आणि सर्व भाविकांना मुक्तपणे देवीचे दर्शन घेता यावे या मागणीसाठी आज भाजपाच्या वतीने महाद्वार चौक येथे अंबामातेचा जागर घालून मंदिराचे दार उघडण्यासाठी देवीला साकडे घालण्यात आले.
भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी महाद्वार चौक येथे एकत्र येत प्रशासनाचा निषेध नोंदवला. भक्ती संगीताच्या माध्यमातून गोंधळ-यांनी अंबामातेचा जागर करून भक्तांना दर्शनासाठी मंदिराचे दार खुले करण्यासठी साद घातली.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, गेले दिड वर्षे कोरोनाचे संकट चालू होते म्हणून भाविकांची श्रद्धास्थाने बंद होती. कोरोनाचे संकट कमी झाल्यांनतर भाजपाच्या सातत्याच्या मागणीमुळे राज्यातील सर्व मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यात आली. परंतु कोल्हापूर मधील जगप्रसिद्ध अंबाबाई मंदिर मात्र या प्रशासनाच्या अडमुठेपणामुळे अद्याप ई पासची सक्ती करून, एक दरवाजा खुला करून सुरु आहे. यामुळे स्थानिक भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाची यामाची भूमिका काय असा सवाल आहे. मंदिरावर उपजीविका करणा-या अनेक घटकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे आज जागर आंदोलनाच्या माध्यमातून उद्धवजींना सुबुद्धी देऊन हे सर्व चुकीच्या पद्धतीने सुरु असलेले प्रशासनाचे कार्य बंद करून सर्व सामान्य लोकांसाठी प्रशासनाचा उपयोग होऊदे यासाठी आजचा जागर म्हणावा लागेल असे सांगत गोंधळ-यांच्या माध्यमातून देवीला साकडे घालण्यात आले, देवी तूच या भ्रष्ट राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे आणि राज्यातील सुरु असणारे चुकीच्या पद्धतीचे कार्य थांबू दे. आजच्या आंदोलना नंतर देखील प्रशासनाने ई पास व दरवाजे उघडण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर भाजपाच्यावतीने यापुढे उग्र आंदोलन करून भक्तांना दर्शनासाठी मंदिराचे दारे खुली करण्यात येतील असा इशारा दिला. कार्यक्रमाची सांगता देवीची आरती करून करण्यात आली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश देसाई, दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, विजय आगरवाल, चंद्रकांत घाटगे, अजित सूर्यवंशी, विजयसिंह खाडे-पाटील, सुनीलसिंह चव्हाण, इक्बाल हकीम, विशाल शिराळकर, नजीम अत्तार, अभिजित शिंदे, दिग्विजय कालेकर, गिरीष साळोखे, रवींद्र मुतगी सचिन सुतार, महेश यादव, किरण कुलकर्णी, बापू राणे, अशोक लोहार, ऋतुराज नडाळे, अमृत लोहार, प्रतिक मालंडकर, नजीर देसाई ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments