सायकलिंग खेळाच्या एक्सलन्स सेंटरमध्ये प्रवेशासाठी 8 नोव्हेंबर रोजी निवड चाचणी
कोल्हापूर, दि. 3 : राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने
राज्यात ॲथलेटिक्स, शुटींग व सायकलिंग या तीन खेळाची एक्सलन्स सेंटर
कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सायकलिंग या खेळाच्या एक्सलन्स
सेंटरमध्ये प्रवेशासाठी 1 जानेवारी 2007 ते 31 डिसेंबर 2009 या कालावधीत
जन्म दिनांक असणाऱ्या खेळाडूंची जिल्हास्तरीय निवड चाचणी दिनांक 8
नोव्हेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे.
यामध्ये मुलासाठी 166 मी धावणे, मुलीसाठी 800 मी धावणे, उभी लांब उडी,
उभी उंच वडी व खेळाडूंची उंची याबाबीची चाचणी घेण्यात येणार आहे. यामधील
गुणाक्रंमे प्रथम 2 मुले व 2 मुली यांची राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड
करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी खेळलेल्या
व प्रवेशासाठी 1 जानेवारी 2007 ते 31 डिसेंबर 2009 या कलावधीत
जन्मलेल्या खेळाडूंची दि. 11 नोव्हेंबर रोजी बालेवाडी, पुणे येथे
होणाऱ्या राज्यस्तर चाचणीसाठी थेट निवड करण्यात येणार आहे.
तरी जिल्हास्तरीय सायकलिंग या खेळाच्या निवड चाचणीसाठी दि. 8 नोव्हेंबर
रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे सकाळी 8 वाजता आधार कार्डची छायांकित
प्रत घेऊन जास्ती जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.
No comments