Header Ads

Header ADS

पणजी येथे पेन्शन अदालत


सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनसंबंधी प्रभावीपणे निवारण करण्यासाठी गोवा पोस्टल क्षेत्रीय कार्यालया तर्फे पेन्शन अदालतचे आयोजन केले आहे. ज्या मध्ये गोवा राज्य, महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अणि सिंधुदुर्ग जिल्हयाचा समावेश आहे. पोस्ट मास्तर जनरल, क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा येथे बुधवार दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आलेली आहे.

             डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पेन्शन संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 3 महिन्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तत्कारींची या डाक पेन्शन अदालन मध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे. उदा उत्तरधिकार तसेच धोरणात्मक स्वरुप संबंधित तत्कारी पेंन्शन अदालत मध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलांसह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यांस मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. संबंधितांनी पेंन्शन बाबतची आपली तक्रार श्री एरीक्सन पी. सॅमुअल,सहा लेखाधिकारी, सचिव पेन्शन अदालत, क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा कार्यालय,यांचे नाव अतिरिक्त प्रति सह दिनांक 20 नोव्हेंबर 2021 अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. च्या नंतर प्राप्त आलेल्या अर्जाचा पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही .अशी माहिती अधीक्षक  डाकघर सिंधुदुर्ग विभाग यांनी दिली आहे.  

No comments