Header Ads

Header ADS

मत्स्यव्यवसायिक व मत्स्यकास्तकार यांनीकिसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासठी कॅम्पचे आयोजन


सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) जिल्ह्यातील जास्तीत जास्त मत्स्यव्यवसायिक व मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 8 नोव्हेंबर 2021 पासून तीन महिन्यासाठी प्रत्येक शुक्रवारी कॅम्पचे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यानुषंगाने गुरुवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.वाजता खालील ठिकाणी किसान क्रेडिट कार्डचे ‍कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोंदा मच्छीमार सहकारी संस्था, पिरवाडी, आरोंदा, ता. सावंतवाडी, रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्था, दांडी मालवण, र्वेगुर्ला मच्छीमार सहकारी संस्था,गिरपवाडा,ता. र्वेगुर्ला ,वाचनालय, तांबळडेग, ता. देवगड .

                 तरी इच्छुक मच्छिमारांनी उपस्थित रहावे.अशी माहिती  र.ग. मालवणकर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय  सिंधुदुर्ग मालवण यांनी दिली आहे.

No comments