कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरती
कोल्हापूर दि. 01 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या
अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन करिता तात्पुरत्या स्वरुपात
कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरण्यात येणार असून इच्छूकांनी
आपले अर्ज दि. 7 डिसेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा
करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अशासकीय पहारेकरी हे पद कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर आहे. माजी
सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच इतर अटी, शर्ती व
सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी
क्र. 0231-2665812 वर संपर्क साधावा.
No comments