Header Ads

Header ADS

छात्र सेना पथकाचे वार्षिक प्रशिक्षण शिबीरवस्तुच्या पुरवठ्यासाठी दरपत्रकाची मागणी



कोल्हापूर दि. 01  :  एन. सी. सी. भवन कोल्हापूर येथे 14 डिसेंबर
ते 23 डिसेंबर या कालावधीत 56 महाराष्ट्र छात्र सेना पथक कोल्हापूर यांचे
वार्षिक प्रशिक्षण शिबीर होणार आहे. या शिबीरासाठी आवश्यक असलेल्या
वस्तुंच्या पुरवठ्यासाठी दरपत्रकाची मागणी करण्यात आली आहे.

दरपत्रक मागणी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये सर्व प्रकारची धान्ये, तेल,
डाळी, मसाल्याचे पदार्थ, बेकरी उत्पादने, मटण, चिकन, अंडी, दुध व
दुग्धजन्य पदार्थ, पालेभाजी, फळभाजी आणि फळे यावस्तूसह स्वयंपाकी दोन
मदतनीस यांचा समावेश आहे.

इच्छुकांनी आपली दरपत्रके समादेशक अधिकारी, 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी
भवन, दुसरा मजला, सम्राट नगर, कोल्हापूर येथे सादर करावी, असे कर्नल डी.
एस. सायना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments