Header Ads

Header ADS

वारणा सहकारी साखर कारखान्यास १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर मध्ये आलेल्या उसाचे २९७७ रु. प्रमाणे एकरकमी एफआरपी जमा...आज अखेर चार लाखांहून अधिक टनांचे गाळप - आमदार विनय कोरे (सावकर) यांची माहिती...


*श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरची एकरकमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. कारखान्याने १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील तोडणी- वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली आहेत...*

*कारखान्याचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ ला सुरू झाला. त्यापासून ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंतची ऊस बिले एकरकमी एफआरपी प्रतिटन २९७७ प्रमाणे यापूर्वीच दिली आहेत. कारखान्यास १ ते १५ नोव्हेंबर २०२१ अखेर एकूण या काळात १ लाख ४८ हजार ५८४.२३७ टन उस गाळपास आला. सदर गाळपास आलेल्या उसाच्या बिलाची एकूण रक्कम ४४ कोटी २३ लाख ५९ हजार ७१ रुपये इतकी होते. त्यापैकी १२ कोटी ८२ लाख ९५ हजार ९२३ रुपये इतकी रक्कम विकास सोसायट्यांमध्ये सभासद व शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केली आहे व उर्वरीत ३१ कोटी ४० लाख ६३ हजार १४८ इतकी रक्कम सभासद व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे...*

No comments