Header Ads

Header ADS

25 ते 28 जानेवारी कालावधीत ऑनलाईनरोजगार मेळाव्याचे आयोजन


 
 कोल्हापूर, दि. 24  : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने राज्यातील उमेदवारांना विविध खासगी क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने दि. 25 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा’निमित्त ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
         या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जिल्हयातील अनेक खासगी उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून रिक्तपदांची नोंदणी महास्वयंम या वेब पोर्टलवर केली आहे.
          हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे.  जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पसंती क्रम व इच्छुकता ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे / संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवारांना शक्य होईल.
          इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार 28 जानेवारी रोजी मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएसद्वारे अथवा दूरध्वनीद्वारे उद्योजकांकडून कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.      
इच्छुक युवक/युवतींनी दि. 28 जानेवारीपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0231-2545677 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
000000
 

No comments