जाधव कुटुंबियांची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट
कोल्हापूर, दि. 18 : उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत आमदार जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन जाधव कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही दिवंगत आमदार जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील ,जयश्री जाधव, बंधू संभाजी जाधव, पुत्र सत्यजीत चंद्रकांत जाधव यांच्यासह जाधव कुटुंबियातील इतर सदस्य उपस्थित होते .
000000
No comments