Header Ads

Header ADS

स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी यांनी समस्या निराकरणासाठीतहसील अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे


 
कोल्हापूर,दि.27: जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी यांना त्यांच्या काही समस्या, प्रश्न असल्यास त्यांच्या समस्या, प्रश्नांवर योग्य  त्या कार्यवाहीच्या दृष्टीने चर्चा व निराकरणासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी यांनी ते ज्या तालुक्यात सद्यस्थितीत राहत आहेत, त्या तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयात तहसिलदारांसमक्ष शुक्रवार, दि. 28 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4 वाजता उपस्थित राहून आपले प्रश्न व समस्या मांडाव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी केले आहे.
 त्याचप्रमाणे करवीर तालुक्यातील जे स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी करवीर तालुक्यात व कोल्हापूर शहरात राहतात, त्यांनी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे शुक्रवार, दि. 28 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4 वा. समक्ष उपस्थित राहून आपले प्रश्न व समस्या सांगाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000

No comments