Header Ads

Header ADS

*श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमन पदी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)...*


*श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमनपदी शाहूवाडी - पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व व्हा.चेअरमनपदी कारखान्यांचे जेष्ठ संचालक प्रतापराव बाळकृष्ण पाटील (रा. शिगांव ता. वाळवा जि.सांगली) यांची दुसऱ्यांदा सर्वानुमते निवड करण्यात आली. या विशेष निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांत बी.आर.माळी हे उपस्थित होते...*

*उस उत्पादक शेतकरी, सर्व सभासद व कारखान्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी प्रयत्न करु. वारणा साखर कारखाना सलग ५ व्यांदा बिनविरोध करून सभासंदानी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असे आश्वासन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी दिले...*

*यावेळी विशेष निवड सभेस कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांच्यासह सर्व संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते...*

No comments