एफ.आर.पी. थकबाकी वसुलीसाठी तुरची येथील साखर विक्रीचे टेंडर 24 फेब्रुवारीला - तहसिलदार रविंद्र रांजणेटेंडर फॉर्म जमा करण्याची मुदत 23 फेब्रुवारी पर्यंत
सांगली दि. 17 : एफ.आर.पी. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी तासगाव तालुक्यातील एसजीझेड अँड एसजीए शुगर लि. (युनिट-1) तुरची येथील साखर विक्रीचे टेंडर तहसिल कार्यालय तासगाव येथे दि. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आले आहे. अशी माहिती तासगाव तहसिलदार रविंद्र रांजणे यांनी दिली.
टेंडर फॉर्म तहसिल कार्यालय तासगाव येथे उपलब्ध करून देण्यात येतील. इच्छुक फर्म / संस्थेने 1 लाख रूपयांचा डी.डी. तहसिलदार तासगाव या नावाने जमा करून टेंडर फॉर्म घ्यावयाचा आहे व सदर टेंडर फॉर्म दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसिल कार्यालय तासगाव येथे जमा करावयाचा आहे. निविदा दि. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता तुरची येथील कारखाना स्थळावर उघडण्यात येतील आणि साखर विक्रीचा निर्णय घेण्यात येईल. टेंडर मंजूर / नामंजूर करण्याचा अधिकार तहसिल कार्यालय तासगाव या कार्यालयाने राखून ठेवलेला असून कार्यालयाच्या अटी व शर्ती खरेदीदार यांच्यावर बंधनकारक राहतील.
एसजीझेड अँड एसजीए शुगर लि. (युनिट-1) तुरची यांचे सील केलेल्या साखर गोदामामध्ये कारखान्याची साखर पुढीलप्रमाणे असून प्रति पोते 50 किलो ग्राम आहे. SS-30 - 14 हजार 120 पोती, M-30 - 620 पोती, S-30 - 200 पोती अशी एकूण 14 हजार 940 पोती साखर असल्याचे तहसिलदार रविंद्र रांजणे यांनी सांगितले.
No comments