बैठकीला सत्तारूढबरोबरमतदान विरोधकांना
कोल्हापूर
जिल्ह्यात विविध सहकारी संस्थांचे निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणाला वेग आला आहे. निवडणूक लढविताना पॅनेल बांधणी करताना स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पॅनेलमध्ये कोणाला घ्यायचे आणि कोणाला डावलायचे याचे दिव्य गावच्या नेत्यांना करावे लागत आहे. काही संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर काही संस्थामध्ये माघारी कोणी घ्यायची किंवा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची या भूमिकेमुळे काही संस्थांच्या निवडणुकांना बिनविरोधला खो बसत आहे.
सहकारी संस्थामध्ये काही संचालकांची अनेक वर्षे मक्तेदारी चालत आली आहे. ती म्हणतील तीच पूर्व दिशा त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज होत आहेत. प्रत्येक वेळी पॅनेल बांधणी करताना काही नवीन चेहर्यांना संधी न देता जुन्या चेहर्यांनाच संधी दिली जाते. त्यामुळे जुन्या काही कार्यकर्त्यांनी थांबून नव्या चेहर्यांना संधी द्यावी असाही सूर उमटत आहे.
कोल्हापूरच्या पश्चिमेला असलेल्या एका सोसायटीच्या निवडणुकीची चर्चा सध्या त्या गावामध्ये सुरू आहे. काही जुन्या कार्यकर्त्यांबद्दल सभासदांमध्ये नाराजी असल्याने एका सभासदाने बैठकीला सत्तारूढबरोबर पण मतदान विरोधकांना असा सूर आवळल्याने पाडापाडीचे राजकारण होणार हे मात्र निश्चित.
No comments