Header Ads

Header ADS

*अध्यक्षपदी शिवाजी कवठेकर. तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण.यांची बिनविरोध निवड

बालिंगा / प्रतिनिधी*.
राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी शिवाजी कवठेकर. व उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण. यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सन 2021/ 2026 या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. जिल्हा संघटनेच्या 10 जागेसाठी 15 उमेदवारांनी नाम निर्देशन पत्र दाखल केली. त्यापैकी 05 उमेदवारांनी  माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
     बिनविरोध संचालक मंडळ --
1)श्री.शिवाजी कवठेकर.- अध्यक्ष.
2) श्री.नारायण चव्हाण.-उपाध्यक्ष.
3) सौ. शिरमा पाटील.-सचिव.
4) श्री.सचिन पाटील. खजानीस.
5) श्री. संजय सुतार. संचालक.
6) श्री. विठ्ठल कोपार्डे. संचालक.
7)श्री. ज्योतीराम शिंदे. संचालक.
8) श्री. प्रविण खाडे. संचालक.
9) सौ. सुनीता सुतार. संचालिका.
10) सौ. शालाबाई जाधव. संचालिका
          वरील प्रमाणे निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. डी. कुंभार. तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून शिवाजी वाडकर. यांनी काम पाहिले.
      प्रथमच निवडणूक प्रक्रिया राबवून निवडणूक बिनविरोध झाल्याने विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण व फाटक्यांची आतिषबाजी लावून आनंद साजरा केला.

No comments