Header Ads

Header ADS

*चाफोडीच्या युवकांन सत्यात उतरलं स्वप्न* *बांधकाम कामगारांसाठी साकारतंय कामगार भवन आणि मोफत भोजनाची सोय* *महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी

प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी.
     आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. याचं भावनेतून सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला न्याय मिळावा आणि त्यांची उन्नती व्हावी ही आशा मनी बाळगून करवीरचे आमदार पी. एन. पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील चाफोडी या गावचे सुपुत्र बांधकामकामगार संघटनेचे मा. जिल्हासचिव संजय राजाराम सुतार. यांनी 2016 मध्ये राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेची स्थापना केली. बांधकाम कामगारांचे फॉर्म भरण्या पासून ते त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईपर्यंत सर्व काम संजय सुतार. यांनी अगदी तनमन पणाला लावून सुरुवात केली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण सुतार यांनी आपला मार्ग सोडला नाही. आज या संघटनेचे शंभर दोनशे नव्हे तर तब्बल,पाच हजाराच्या वर सभासदांची नाळ  या संस्थेशी जोडण्याचं काम जिल्हासचिव सुतार. यांनी केले आहे. सुतार यांच्या मेहनतीच फळं म्हणजेच आज या लहान वृक्षाच रूपांतर वटवृक्षात झालं आहे.संजय यांच्या नावातच *जय* असल्याने या पाच हजार कामगारांच्या पाठबळावर  संघटनेच्या माध्यमातूनसुतार व त्यांच्या सहकार्यानी एक कोटी वीस लाखाची मदत ही शासनाच्या तिजोरीतून आणण्यात यश मिळवल आहे.यामध्ये प्राथमिक शाळेतील मुलांना शिष्यवृत्ती 12 लाख वाटप,50 विधवा महिलांना 34 हजार रुपये प्रमाणे 15 लाख रुपये,5000 कामगारांना 5000 रुपये प्रमाणे 25 लाख रुपये, तीस प्राथमिक शाळेतील मुलांना दिड हजार पुस्तकांचे वाटप, कोरोना काळात आर्थिक व संसारा पयोगी साहित्य वाटप, पूर परिस्थिती काळात संसारापयोगी साहित्याची मदत असे अनेक सामाजिक व समाजपयोगी उपक्रम या संघटनेच्या माद्यमातून घेण्यात आले. ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सिंटेक्स पाण्याच्या टाकीचे वाटप करवीरचे आमदार पी. एन. पाटील. यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा पाडळी खुर्द येथील कार्यालयात पार पडला.याच बरोबर दरवर्षी परिसरातील शाळेतील मुलांना व वृद्धाश्रमातील लोकांना भोजनाची व्यवस्था संजय सुतार. आवर्जून करतात. संजय सुतार यांनी बांधकाम कामगार संघटनेचे जाळ करवीर तालुक्या पुरतं मर्यादित न ठेवता पन्हाळा, गगन बावडा, राधानगरी, सातारा, कराड, पर्यंत विणण्याचं काम करून गरुड झेप घेतली आहे. याचीच दखल आणि बांधकाम कामगारासाठी असणारी तळमळ पाहून करवीरचे आमदार पी. एन. पाटील. यांनी संजय सुतार यांना बांधकाम संघटनेच्या कामाचा विस्तार वाढविण्यासाठी राज्य पातळीवर काम करण्यासाठी संधी देण्यासाठी प्रयत्न करीन असे पाडळी खुर्द येथील कार्यक्रम प्रसंगी त्यांनी सांगितले.संजय सुतार. यांनी आपला बांधकाम कामगार परगावी गेला आणि रात्री अपरात्री घरी जाता आलं नाही तर आपल्या हक्काचं घर /निवारा असावा म्हणून बांधकाम कामगारांसाठी पाडळी खुर्द ता. करवीर गावी जागा विकत घेऊन कामगार भवन बांधकाम करण्यास सुरुवात केलीआहे.सर्व बांधकाम कामगारांच्या सहकार्याने अवघ्या तीन ते चार महिन्यात या भवनाचे काम पूर्ण होऊन भवन कामगारांच्या सेवेसाठी सज्ज होईल असे सुतार यांनी सांगून या भवनात कामगारांना राहण्यासाठी सोय, मोफत भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा कमिटी, सर्व तालुका कमिटी यांना स्वतंत्र ऑफिस व्यवस्था करण्यात येणार आहे.सुतार यांनी बांधकाम कामगारांसाठी घेतलेला भवन बांधकामाच्या निर्णयाचे स्वागत सर्व बांधकाम कामगारांमधून होतं आहे. बांधकाम कामगारांसाठी भवन बांधकाम व मोफत भोजनाची व्यवस्था हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे. आणि हा प्रयोग संजय सुतार आणि त्यांच्या सहकारी यांच्या प्रयत्नातून आकारास येत आहे. बांधकाम कामगारांना भवन बांधकाम व त्यांच्या उन्नतीसाठी या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कवठेकर, जिल्हा उपाध्यक्ष नारायण चव्हाण, जिल्हा सचिव शिरमा पाटील,नुतन संचालिका सुनीता सुतार. यांच्यासह सर्व तालुक्यातील संचालक मंडळ व सर्व तालुक्यातील बांधकाम कामगारांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मा. जिल्हा सचिव संजय सुतार यांनी सांगून कामगार भवनाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व बांधकाम कामगारांना विश्वासात घेऊन आपल्या बांधकाम कामगारांसाठी  स्वतंत्र हॉस्पिटल बांधकाम करून सर्व कामगारांना एकाच छताखाली उपचारासाठी आणण्याचा मानस आहे. असे मा. जिल्हा सचिव संजय सुतार. ( चाफोडीकर ) यांनी यावेळी सांगितले.

No comments