Header Ads

Header ADS

276-कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक…निवडणूक यंत्रणा सज्ज 357 मतदान केंद्रावर 2 लाख 91 हजार 539 मतदार मतदानाचा हक्क बजावणारमतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा….जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



कोल्हापूर, दि. 11 - 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मंगळवार, 12 एप्रिल सकाळी 7 ते संयकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. या मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.
  276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात 2 लाख 91 हजार 539 इतके मतदार असून या मध्ये 1 लाख 45 हजार 626 पुरुष मतदार, 1 लाख 45 हजार 901 स्त्री मतदार, 95 सैनिक मतदार तर 12 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
उद्या होणाऱ्या मतदानासाठी 357 केंद्रे निश्चित करण्यात आली असून यामध्ये 311 मुख्य केंद्रे तर 46 सहाय्यकारी केंद्रांचा समावेश आहे. 2 हजार 392 मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये 250 राखीव कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 45 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 7  अधिकारी राखीव आहेत. मतदानयंत्रे व कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी कोल्हापूर महापालिकेच्या 20 बस, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या 49 बस आणि 3 जीपची सोय करण्यात आली आहे.
मतदानासाठी 472 मतदान यंत्रे असून 115 यंत्रे राखीव आहेत. मतदार संघात मतदार केंद्र क्रमांक 97 आदर्श मतदान केंद्र तर केंद्र क्रमांक 105 सखी मतदान केंद्र असून 108 मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षक, 181 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग, 68 मतदान केंद्रांवर व्हिडीओग्राफी, 108 मतदान केंद्रांवर CPF ची सोय करण्यात आली आहे. 670 टपाली मतदारांपैकी 80 पेक्षा अधिक मतदारांचे मतदान लिफाफे प्राप्त झाले आहेत, यामध्ये 18 दिव्यांगा मतदारांचा समावेश आहे. उद्या होणाऱ्या मतदानाची मतमोजणी 16 एप्रिल2022 रोजी शासकीय गोदाम, राजाराम तलाव,  सरनोबतवाडी रोड, कोल्हापूर येथे होणार आहे. 
00000

No comments