दिव्यांग, 80 वर्षावरील नागरिकांना मतदानासाठी मोफत वाहनाची सोय* *-जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार*
कोल्हापूर, दि. 10 : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मंगळवार दि.12 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्यासाठी रिक्षाची सोय करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने या मतदारांना मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी ही मोफत वाहन सुविधा दिली आहे.
टपाली मतदान न केलेल्या 80 वर्षावरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना ही वाहनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्यांनी यापूर्वी टपाली मतदान केले आहे, अशा मतदारांना मतदान केंद्रावर येवून मतदान करता येणार नाही. याबाबतची सविस्तर माहिती 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या FACEBOOK PAGE, Whats App, Twitter, Instagram वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या मतदार संघातील 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी या सुविधेचा 100 टक्के लाभ घ्यावा व मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी केले आहे.
0 0 0 0 0 0
No comments